Connect with us

केंद्राचे निर्णय

Kartiki Ekadashi: government ban to sell alcohol and meat on kartiki ekadashi in pandharpur – अखेर पंढरपुरात तीन दिवस मांस, मद्य विक्रीस बंदी

Published

on

सोमवारी साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस आणि दारू विक्रीस परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर प्रशासनाने अखेर आपली चूक सुधारली आहे. प्रशासनाने कार्तिकी एकादशीच्या तिन्ही दिवशी मांस आणि दारू विक्रीवर बंदी घातली असून त्याचं भाविकांनी स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

अखेर पंढरपुरात तीन दिवस मांस, मद्य विक्रीस बंदी

सुनील दिवाण, पंढरपूर:

सोमवारी साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी मांस आणि दारू विक्रीस परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर प्रशासनाने अखेर आपली चूक सुधारली आहे. प्रशासनाने कार्तिकी एकादशीच्या तिन्ही दिवशी मांस आणि दारू विक्रीवर बंदी घातली असून त्याचं भाविकांनी स्वागत केलं आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या दिवशी, त्याच्या अगोदर आणि नंतरच्या दिवशी असे सलग तीन दिवस पंढरपुरात मासं आणि मद्य विक्रीला बंदी घातली जाते. परंतु कार्तिकी यात्रेच्या इतिहासात प्रथम जिल्हा प्रशासनाने एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे १८ नोव्हेंबर रोजी मांस आणि मद्य विक्रीस बंदी घालून दोन दिवस मांस विक्रीला परवानगी दिली होती. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. भाविकांनीही प्रशासनाच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने अखेर त्यांचा निर्णय मागे घेतला आहे.

दरम्यान, एकादशीनिमित्त कोल्हापूर, कोकण, कर्नाटकामधून सुमारे चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. भाविकांना दर्शनासाठी मंदिर समितीने गोपाळपूर येथे दहा मंडप तयार केले असून त्यापैकी आठ मंडप गर्दीने भरून गेली आहेत. दर्शन रांगेत भाविकाना स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा देण्यात येत आहे. तसेच दर्शन रांगेतील स्क्रीनवरून विठ्ठलाचे थेट दर्शन भाविकाना होत आहे.

मंदिर समितीने भाविकांना लवकरात लवकर विठ्ठलाचे दर्शन व्हावे म्हणून दर्शनाची रांग चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याकाळात व्हीआयपी आणि ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

 

मिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi)   से  मराठी बातम्या( Marathi News)
तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App …आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

Kolhapur + Western Maharashtra News
News
 याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा
 Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

Source link

قالب وردپرس

केंद्राचे निर्णय

Anil Kapoor: bollywood actor anil kapoor suffered calcification in shoulder injury – अनिल कपूर यांचीही आजाराशी झुंज

Published

on

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या फिटनेसवर तरुणाई फिदा असते. ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेसला दाद मिळत असते. मात्र, अनिल कपूर सध्या एका आजाराशी झुंजत आहेत. अनिल कपूर मागील काही काळांपासून खांदेदुखीने त्रस्त असून उपचारासाठी जर्मनीला जाणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

अनिल कपूर यांचीही आजाराशी झुंज

मुंबई: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या फिटनेसवर तरुणाई फिदा असते. ६२ वर्षांच्या अनिल कपूर यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेसला दाद मिळत असते. मात्र, अनिल कपूर सध्या एका आजाराशी झुंजत आहेत. अनिल कपूर मागील काही काळांपासून खांदेदुखीने त्रस्त असून उपचारासाठी जर्मनीला जाणार आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनिल कपूर यांनी आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली. अनिल कपूर यांना ‘कॅल्सफक्शेन ऑफ शोल्डर’ ही व्याधी जडली आहे. यामध्ये खांद्याची हालचाल करण्यास त्रास जाणवतो. कालांतराने खांद्याची हालचाल होणे मंदावते. मागील दोन वर्षांपासून उजव्या खांद्यात कॅल्शिअम जमा झाल्यामुळे त्याचा त्रास आणखी वाढत असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले. उपचारासाठी एप्रिल महिन्यात अनिल कपूर जर्मनीला रवाना होणार आहेत. सध्या जर्मनीतील डॉक्टरांच्या नियमित संपर्कात असून काळजी घेत असल्याचे अनिल कपूर यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून बॉलिवूड कलाकार आजारी असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच अनिल कपूर यांच्या आजारपणाची बातमी समोर आल्यामुळे सिने चाहते काळजीत आहेत.

 

मिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi)   से  मराठी बातम्या( Marathi News)
तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App …आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

entertainment news
News
 याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा

Source link

قالب وردپرس

Continue Reading

केंद्राचे निर्णय

Maharashtra cabinet: in maharashtra now lokayukta can inquire chief minister – मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करणार लोकायुक्त

Published

on

मुंबई :

राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीत सर्व समावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कक्षेत आणण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती.

महाराष्ट्र शासनाने किंवा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शासनाच्या मालकीची किंवा नियंत्रणाखालील महामंडळे, कंपन्या यासारख्या काही प्राधिकारी संस्थांतर्फे करण्यात आलेल्या प्रशासकीय कार्यवाही संबंधिच्या जनतेच्या गाऱ्हाण्यांची आणि लाचलुचपतसंबंधी तक्रारींची चौकशी लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम- १९७१ मधील तरतुदीनुसार करता येते. मात्र, त्यात मुख्यमंत्री या पदाचा समावेश नव्हता. तो आता होणार आहे.

केंद्रीय लोकपाल अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन राज्याच्या महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम-१९७१ मध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. या सुधारणेंमुळे लोक आयुक्त अधि‍क सक्षम होणार आहे. तसेच याची कार्यकक्षा वाढून तो अधिक प्रभावी ठरणार आहे. यासोबतच लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या नेमणुकीसाठी शिफारस करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच नियुक्ती करण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित सात सदस्यांची एक शोध समिती देखील गठीत करण्याच्या तरतुदीचा देखील समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मंत्रिमडळाच्या मान्यतेने विधि व न्याय विभागाच्या सहमतीने आवश्यक ते फेरबदल करण्यासही मुभा देण्यात आली आहे.

सकारात्मक निर्णयाबद्दल धन्यवाद: अण्णा

लोकायुक्तसंबंधी राज्यमंत्रिमंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल जनतेच्यावतीने त्यांना धन्यवाद देत आहे. मात्र, कायदा विधिमंडळात बनतो, त्यामुळे जेव्हा तो तेथे समंत होईल. तेव्हाच आम्ही मानू, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयावर बोलताना दिली.

Source link

قالب وردپرس

Continue Reading

केंद्राचे निर्णय

accident near horti: three solapur residents dead in car accident near horti at karnataka – कर्नाटक अपघातात सोलापुरातील ३ जण जागीच ठार

Published

on

कर्नाटकमधील होर्ती गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापुरातील धोत्री गावचे डॉक्टर आणि अन्य दोघं जण जागीच ठार झाले. हे सर्व जण कर्नाटकात उपचारासाठी जात होते, अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:

कर्नाटक अपघातात सोलापुरातील ३ जण जागीच ठार

सोलापूरः

कर्नाटकमधील होर्ती गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापुरातील धोत्री गावचे डॉक्टर आणि अन्य दोघं जण जागीच ठार झाले. हे सर्व जण कर्नाटकात उपचारासाठी जात होते, अशी माहिती मिळाली आहे.

डॉ. वैजिनाथ विश्वनाथ दरेकर (वय ३५), अमोल मल्लापा नंदणगे (वय २८), आणि त्यांची पत्नी अश्विनी अमोल नंदणगे (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. दरेकर आणि नंदणगे दाम्पत्य मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून दक्षिण सोलापुरातील धोत्री या गावाहून कर्नाटकात उपचारासाठी निघाले होते. कर्नाटकातील होर्ती गावाजवळ आले असता, समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील डॉक्टर आणि नंदणगे दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, कराच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. डॉक्टर आणि त्या दाम्पत्याचे मृतदेह कारमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालकांनी मदत केली. मात्र, वेळ निघून गेली होती. ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

दरम्यान, कर्नाटकात झालेल्या या भीषण अपघाताची माहिती धोत्री गावात समजताच डॉ. दरेकर आणि नंदणगे कुटुंबीय आणि धोत्री गावावर शोककळा पसरली आहे.

 

मिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi)   से  मराठी बातम्या( Marathi News)
तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App …आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट

Kolhapur + Western Maharashtra News
News
 याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

Source link

قالب وردپرس

Continue Reading

Trending